Admission Open for 2016-2017


अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे, अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले ता. अकोले, जि. अहमदनगर वरिष्ठ महाविद्यालय – ऑनलाईन प्रवेशासंबधी सूचना  सर्व वर्गांसाठी दि. ०६/०६/२०१६ पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.agasticollege.com या संकेतस्थळाचा वापर करावा.  प्रवेशासाठी येतांना १२ वी चे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो ई. कागदपत्रे SCAN करून ऑनलाईन पद्धतीने भरावीत.  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतांना स्वत:चा मोबाइल नंबर, ई-मेल आय. डी. तयार ठेवावा. USER NAME आणि PASSWORD तयार केल्यानंतर ते पुढील सर्व प्रक्रिया आणि पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडेल म्हणून लक्षात ठेवावे.  प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरून निश्चित केल्यानंतर त्याची प्रिंट काढून प्रवेश समितीकडून तपासून दोन दिवसात आपला प्रवेश महाविद्यालयात निश्चित करावा. प्रथम वर्ष कला  प्रथम वर्ष कला वर्गासाठी दि. ०६/०६/२०१६ पासून थेट ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे.  ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष कला वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी दिनांक २५/०६/२०१६ पूर्वी ऑनलाईन फॉर्म भरून प्रवेश घ्यावा.  फॉर्म प्रिंट काढून प्रवेश समिती कडून तपासून घेवून आपला प्रवेश निश्चित करावा.  प्रथम वर्ष कला वर्गासाठी थेट प्रवेश पद्धतीने प्रवेश दिले जातील. तरी सदर प्रक्रियेस गुणवत्ता यादी लावली जाणार नाही.  विषयांच्या माहितीसाठी नोटीस बोर्डचा वापर करा. प्रथम वर्ष वाणिज्य  F.Y.B.Com. या वर्गाचे प्रवेश गुणवत्ता यादी नुसार होतील.  ग्रंथालयातून फक्त एफ. वाय. बी. कॉम या वर्गासाठीच फॉर्म मिळेल व आपले नाव नोंदवून फॉर्म घ्यावा.  विद्यार्थ्यांनी भरलेला फॉर्म व कागदपत्रे नोटीस बोर्डवर दिलेल्या सुचणे प्रमाणे गुणवत्ता यादीसाठी कार्यालयात जमा करावीत.  गुणवत्ता यादीसाठी ग्रंथालयाचा व कार्यालयाचा नोटीस बोर्ड बघावा.  ज्या विद्यार्थ्यांची नावे गुणवत्ता यादीत आली आहेत त्यांनी निश्चित केलेल्या दिनांकापुर्वी ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंट करावा व प्रवेश समितीकडून तपासून घेवून कार्यालयात जमा करावा.  निश्चित केलेल्या दिनांकानंतर प्रवेश दिला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. प्रथम वर्ष विज्ञान  प्रथम वर्ष विज्ञान वर्गासाठी दि. ०६/०६/२०१६ पासून थेट ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे.  या वर्गासाठी खालील प्रमाणे प्रवेश क्षमता आहे  अनुदानित विद्यार्थी संख्या १२०  विना-अनुदानित विद्यार्थी संख्या १२०  एकूण प्रवेश क्षमता २४०  उशिरा आलेल्या प्रवेश अर्जांचा विचार केला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.